नेवासा - प्रशांत गडाख यांचा अभिनव वाढदिवस साजरा ; 16 लाखांची पुस्तके जमा. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, December 28, 2019

नेवासा - प्रशांत गडाख यांचा अभिनव वाढदिवस साजरा ; 16 लाखांची पुस्तके जमा. | C24TAAS |

नेवासा - प्रशांत गडाख यांचा अभिनव वाढदिवस साजरा ;
16 लाखांची पुस्तके जमा. | C24TAAS |नेवासा - यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी आपल्या वाढदिवसानिमित 'पुस्तके भेट' हा उपक्रम राबविला असून केलेल्या अहवानाला जिल्ह्यातील अनेकांनी साथ देत सुमारे 16 लाख रूपायची पुस्तके जमा झाली असून लवकरच ही पुस्तके विविध वाचनालयत मोफत देण्यात येणार आहे. हार ,तुरे ,डोलीबाझा व मोठ्या डामडौलाला फाटा देत एक आगळ्या वेगळ्या वाढदिवसाचा आदर्श प्रशांत गडाख यांनी तरुणासमोर ठेवला आहे. शेता बांधावरील फेटा , टोपी घालणारे लोक पुस्तके देत असतांना दिसत होते हे आगळे वेगळे चित्र या निमिताने दिसले.
दोन दिवसांपूर्वी प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियावर आवाहन केले की वाढदिवस कोणी कसा साजरा करावा ? हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण वाढदिवस हा कौटुंबिक सोहळा असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. यावेळी वाढदिवस साजरा करण्यामागे माझा एक स्वार्थ आहे. आपण सर्वांनी सुरु केलेल्या ‘गाव तिथे वाचनालय’ या उपक्रमात मला अधिक पुस्तके हवी आहेत. म्हणून २७ तारखेला मळ्याबाहेर एक पुस्तकांचा स्टाॅल असणार आहे. त्या स्टाॅलवर विविध क्षेत्रातील ग्रंथ विक्रीसाठी असणार आहेत. तेथून खरेदी केलेल्या प्रत्येक ग्रंथाचे ५०% पैसे मी स्वतः भरणार आहे आणि ५०% तुम्ही द्यावेत अशी अपेक्षा आहे.


प्रशांत गडाख यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र , हितचिंतक सोनई येथील मळ्यात सकाळी 9 वाजल्यापासून येत होते त्यात पत्रकार , साहित्यिक , वकील , डॉक्टर , प्राध्यापक, महिला , विध्यार्थी , फेटे घातलेले जेष्ट मंडळी तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेली अनेकजण येत होते . घराच्या अग्रभागी पुस्तकांचा स्टाल लावला होता प्रत्येकजण तेथुन पुस्तक खरेदी करून गडाख यांच्या हातात देऊन शुभेच्छा देतांना दिसत होते . त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना , महिलांना , स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या युवक , युवतींनी या पुस्तकांचा फायदा होईल या भावनेतून प्रशांत गडाख यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे .
या वाढदीवसानीमित्त आ शंकरराव गडाख मित्र मंडळाने राळेगणसिद्धी येथील प्राथमिक शाळेला पुस्तके भेट दिली व जेष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली . जेष्ट साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विचारांचा वसा तरुणाई जोपासत आहे .गडाखांची सामाजिक बांधीलकी उत्तम असल्याचा अण्णांनी लिहून दिलेला अभिप्राय शाम पठारे यांनी उपस्थितांना वाचून दाखविला .
इस्राईल येथे असलेले सोनई महाविद्यालयाचे चे माजी विद्यार्थी डॉ रवींद्र फाटके व डॉ नीता फटके यांनी प्रशांतभाऊ गडाख यांची वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट द्यावी ही पोस्ट वाचल्यानंतर दहा हजार रुपयाची पुस्तक भेट देण्याची इच्छा व्यक्त केली व त्याप्रमाणे त्यांनी पुस्तके भेट दिली .जेष्ट नेते यशवंतराव गडाख यांच्यामुळे आम्हा कुटुंबियांना साहित्याची गोडी लागली.पुस्तक वाचनाचे महत्व कळाले. हे ज्ञान व सवय आपल्यापुरती न राहता आपल्या माणसात पोहचावी या उद्देशाने ' गाव तेथे वाचनालय ' ही संकल्पना सुचली. भेट आलेली पुस्तके गाव गावच्या वाचनालयात पाठविण्यात येणार आहेत मी स्वतः हे सगळे ग्रंथ खरेदी करू शकलो असतो पण या मागे ' हे मी केले ' अस न होता ' हे आपण सर्वांनी केलं हा संदेश जावा आणि वाचन चळवळ आणखी बळकट व्हावी अशी माझी भावना होती - प्रशांत गडाख

No comments:

Post a Comment