नेवासा - खड्ड्यात केक कापून पत्रकाराचा वाढदिवस साजरा. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 6, 2019

नेवासा - खड्ड्यात केक कापून पत्रकाराचा वाढदिवस साजरा. | C24TAAS | श्रीरामपूर मार्गावर चक्क पत्रकारांना वाढदिवस साजरा करत रोडवर उतरून गांधीगिरी करावी लागली.नेवासा : - नेवासा-श्रीरामपूर दरम्यान बेलपिंपळगाव फाट्यावरील रस्त्याला पडलेल्या खड्ड्यात केक कापून  नेवासा एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विलास धनवटे यांचा वाढदिवस गांधीगिरी करत अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.
नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीने संघटनेतील सर्व सदस्यांचा वाढदिवस कार्यक्रम केला जातो. त्याच प्रमाणे मंगळवारी संघटनेचे उपाध्यक्ष विलास धनवटे यांचा वाढदिवस होता.परंतु संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर हे खाजगी कामानिमित्त संगमनेर या ठिकाणी गेले होते काम आटोपून श्रीरामपूर दरम्यान असताना त्यांनी बेलपिंपळगाव येथील सदस्य पत्रकार प्रतीक सुरसे यांना फोन करून धनवटे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन कळवले.परंतु रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांची गाडी पंक्चर झाल्याने त्यांना
बेलपिंपळगाव येथे येण्यास रात्री उशिर झाला.तेथे पोहचल्यावर त्यांना एक नविन कल्पना सुचली व खड्ड्यात वाढदिवस साजरा करायचं ठरवलं.  हा रोड अत्यंत रहदारीचा असून या रोडवरून रोज हजारो वाहने येतात जातात पण हा रस्ता खराब झाल्यामुळे या ठिकाणी रोज अनेक अपघात घडतात याचा निषेध करत चक्क पत्रकारांना देखील रोडवर उतरून गांधीगिरी करावी लागली हे वाईट आहे. त्यावेळी गावातील तरुणांना बरोबर घेऊन नेवासा- श्रीरामपूर रस्त्यावरील एका खड्ड्यात बसून रात्री अकराच्या सुमारास धनवटे यांचा वाढदिवस साजरा करत बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. 
दरम्यान यावेळी रस्त्यावरून चाललेले वाहन धारक बाळासाहेब विखे ,अरुण कडू हे देखील या उपक्रमात सामील झाले.यावेळी दादासाहेब पवार,एकनाथ घोगरे,स्वप्नील ओहोळ,किरण साठे ,राहुल शिंदे ,सचिन जाधव ,प्रतीक सुरसे , बाळासाहेब शेंडगे, बापुसाहेब शिंदे,अमोल वरघूडे,श्रीकांत भागे,अशोक कनगरे,प्रमोद भद्रे ,गणेश भद्रे ,दत्तात्रय नवले ,तसेच रोडवरती प्रवास करणारे अनेक प्रवाशी या ठिकाणी थांबून या गांधीगिरीत उपस्थित होते


शंकर नाबदे, नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment