नेवासा - आईच्या वाढदिवसानिम्मित वृध्दाश्रमातील वृद्धांना दिवाळीचे फराळ व कपडे वाटप. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 6, 2019

नेवासा - आईच्या वाढदिवसानिम्मित वृध्दाश्रमातील वृद्धांना दिवाळीचे फराळ व कपडे वाटप. | C24TAAS |

नेवासा - आईच्या वाढदिवसानिम्मित वृध्दाश्रमातील वृद्धांना दिवाळीचे फराळ व कपडे वाटप. | C24TAAS |


पोलीस सेवेत रुजू असलेले घुगरकर यांनी आईचा अनोखा वाढदिवस साजरा केला.

नेवासा :- नेवासाफाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमातील वृद्धांना वाढदिवसाचे औचित्य साधून घुगरकर कुटुंबाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचे फराळ व कपडे वाटप उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत केले. तर सचिव सौ.सुरेखा मगर यांनी प्रास्ताविकात वृद्धाश्रमातील उपक्रमाची माहिती दिली.
पोलीस खात्यात रुजू असलेले नेवासा येथील सागर घुगरकर यांनी त्यांची आई आशाबाई बाळासाहेब घुगरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शरणपुर वृध्दाश्रमातील वृद्धांना साडी चोळी,कपडे व दिवाळी फराळ देवुन वृद्धाचा आनंद द्विगुणित केला.यावेळी सहायक फौजदार बाळासाहेब घुगरकर व आशाबाई घुगरकर यांनी वृद्धांशी संवाद साधला व जीवनातील हि दिवाळी आनंद व प्रेरणा देणारी ठरली असल्याचे सांगत यापुढे वेळोवेळी असे उपक्रम करून वृद्ध आश्रमास मदत करण्याची ग्वाही घुगरकर यांनी दिली.
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांनी प्रार्थना गीते गायली उपस्थित वृद्धांना फराळ वाटप करण्यात आले.

शंकर नाबदे, नेवासा.मो.9960313029

No comments:

Post a Comment