नेवासा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेन्शनर संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, November 5, 2019

नेवासा - विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेन्शनर संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. | C24TAAS |

नेवासा - नेवासा तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयावर मंगळवारी दि.५ नोव्हेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला.नेवासा पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता द्या नाहीतर इच्छा मरणाला परवानगी द्या असे भावनिक आवाहन मोर्चातील अनेकांनी यावेळी बोलताना केले.
         नेवासा तहसील काढण्यात आलेल्या मोर्चात कॉ. बाबा आरगडे,अहमदनगर जिल्हा पेन्शनर संघटनेचे सचिव उदयकुमार बल्लाळ नेवासा तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष बापूराव बहिरट यांनी केले. नेवासा तालुक्यातील  ईपीएस ९५ पेन्शनरला पेन्शन वाढ मिळाली पाहिजे,पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता मिळाला पाहिजे,किमान ७,५०० इतकी पेन्शन देण्यात यावी,पेन्शन सोबत महागाई भत्ता देण्यात यावा पेन्शनर व त्याच्या पत्नीस मोफत वैद्यकीय सेवा मिळावी,सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उच्च पेन्शनरला पात्र झालेल्या पेन्शनरला उच्च पेन्शन मिळावी या मुख्य मागण्यांसह  यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी विनायक लोळगे, ज्ञानेश्वर टेकाळे, सुभाष दाणी,वसंतराव डावखर,प्रभाकर बोरकर,प्रकाश कुटे,रमेश ढगे,एकनाथ मुळे,किशोर शिंदे,नानासाहेब भागवत,मच्छिंद्र आगळे यांच्यासह विविध खात्यामध्ये नोकरी केलेले पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.नायब तहसिलदार नारायण कोरडे यांनी पेन्शनरांचे निवेदन स्वीकारले.

शंकर नाबदे नेवासा,मो.9960313029

No comments:

Post a Comment