पुणे - आमदार सुनील टिंगरे यांनी धुतले सफाई कामगारांचे पाय कामगारांचा दिवाळी भेट देऊन सत्कार - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 6, 2019

पुणे - आमदार सुनील टिंगरे यांनी धुतले सफाई कामगारांचे पाय कामगारांचा दिवाळी भेट देऊन सत्कार

आमदार सुनील टिंगरे यांनी धुतले सफाई कामगारांचे पाय
कामगारांचा दिवाळी भेट देऊन सत्कार

दिवाळी संपली आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अडकलो.पण ह्या दिवाळीच्या धावपळीमध्यें एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की दिवाळी सण साजरा करत असताना कळत नकळत आपल्या कडून रस्त्यावर कचरा होतो,घाण होते.
सणवार असो वा उन्हाळा हिवाळा पावसाळा या तीनही ऋतूत सफाई कामगार आपल्या भागात सफाईचे काम अत्यंत चोखपणे बजावत असतात.
स्वतः सुटी न घेता दिवाळी सणात आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार वडगांवशेरीचे आमदार सुनिलअण्णा टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी फुलेंनगर पुणे परिसरातील सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.आमदार सुनिल अण्णा टिंगरे यांनी सफाई कामगार यांचे पाय धुतले व पुष्पहार घालून भेटवस्तू देऊन सफाई कामगारांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाचे आयोजन वडगांवशेरी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिवानी उमेश माने यांचे वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment