मंचर - आंबेगाव तालुक्यातील मंचर ते बेल्ला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे - खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, November 30, 2019

मंचर - आंबेगाव तालुक्यातील मंचर ते बेल्ला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे - खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी


आंबेगाव तालुक्यातील मंचर ते बेल्ला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोठं मोठे खड्डे झाले असून या खड्यामुळे छोटे मोठे  अपघातात होत आहेत त्यामुळे संबंधित सार्वजनिक विभागाने या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याची मागणी प्रवासी,वाहन चालक ,व स्थानिक ग्रामस्थांनी  केली आहे    मंचर तालुका आंबेगाव येथून एस कॉर्नर मार्गे बेल्याला जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे दररोज या रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असून रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत असून संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्यावर अनेकांच्या अपघात होऊन ते गंभीररीत्या जखमी होत आहेत त्यामुळे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याची डागडुजी लवकर करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ संदीप थोरात,संतोष माशेरे , विकास बाणखेले ,अजय थोरात , यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment