पुणे -नवले पूल ते कात्रज सहापदरीकरण कामाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन शुभारंभ -आमदार भिमराव(आण्णा)तापकीर - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 14, 2019

पुणे -नवले पूल ते कात्रज सहापदरीकरण कामाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन शुभारंभ -आमदार भिमराव(आण्णा)तापकीर

नवले पूल ते कात्रज सहापदरीकरण कामाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन शुभारंभ -आमदार भिमराव(आण्णा)तापकीर

पुणे, दि.१४: वडगाव (नवले पूल) ते कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ५४८ डी डी वरील ३.८८ किलोमीटर च्या रस्त्याचे सहापदरीकरण व सेवा रस्त्यासह बांधकाम आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कामासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी प्रयत्न केले आहेत.हा कार्यक्रम उद्या दुपारी १.०० वाजता शिवसृष्टी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज बायपास रोड, पुणे येथे होणार आहे. या कामासाठी ६९ कोटी रुपये खर्च होणार असून काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात रस्त्याचे सहापदरीकरण, सेवा रस्ते, पदपथ, लहान पूल, मोऱ्या, व्हेहीक्युलर अंडर पास, पादचारी भुयारी मार्ग, नवीन बांधकाम, लहान चौक सुधारणा , बस निवारा आदी कामे करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment