अहमदनगर - प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, November 8, 2019

अहमदनगर - प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई.

प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई.अयोध्या खटल्याचा निकालावर शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात धार्मिक सलोखा व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियासह व्हॉट्सअ‍ॅपवर प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या वरआणि अ‍ॅडमिनवर कारवाई केली जाणार आहे.


प्रक्षोभक संदेश पसरवू नका.
ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रक्षोभक संदेश पसरविले जातील, त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संदेश पसरवू नका, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment