संगमनेर - मुस्लिम समाजाच्या नावे काँग्रेसला ते पत्र लिहिणारे भाजपचेच - अनिस शेख - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 21, 2019

संगमनेर - मुस्लिम समाजाच्या नावे काँग्रेसला ते पत्र लिहिणारे भाजपचेच - अनिस शेख


 मुस्लिम समाजाच्या नावे काँग्रेसला ते पत्र लिहिणारे भाजपचेच - अनिस शेख

संगमनेर ( शाविद शेख) राज्यात काँग्रेस - शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन स्थिर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आहे. मात्र यांनी नुकतेच पक्षांतर केले आता ते सत्तेतून बाहेर राहणार आहे. यामुळे त्यांच्या इशार्‍यावर संगमनेरातील काही जणांनी काँग्रेसला पत्र पाठवून संपूर्ण मुस्लीम समाजाची बदनामी करण्याचा डाव रचला आहे. ते पत्र देणारे भाजपचे असल्याचे ठाम प्रतिपादन अल्पसंख्यांक काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अनिस शेख यांनी म्हटले आहे.


 त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, आमदार बाळासाहेब थोरात हे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी सातत्याने सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले आहे. त्यांच्या कारकीर्दीचा आलेख हा संगमनेरसाठी कायम अभिमानास्पद राहिला आहे. एकनिष्ठता व प्रामाणिकपणा यामुळे सध्या त्यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले आहेयाचे काहींना दु:ख होत आहे. त्यांना काँग्रेसने पक्षांमध्ये मोठमोठी पदे दिली त्यांनी नुकतेच पक्षांतर केले व आता भाजप सत्तेपासून दूर राहत आहे. त्यामुळे त्यांना कोणतेही पद मिळणार नाही याचे शल्य त्यांच्या समर्थकांना वाटू लागले आहे. किंबहुना त्यांनीच काँग्रेस प्रेमाचा पुळका दाखवत काँग्रेसला पत्र लिहिले आहे की शिवसेनेबरोबर युती करु नाही मात्र महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी व भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस - शिवसेना एकत्र येत आहे हे चांगलेच आहे. भारतीय रायघटनेचा आदर करून महाविकास आघाडी अस्तित्वात येत आहे हा राष्ट्रीय व राय पातळीवरचा प्रश्न आहेत परंतु संगमनेरातील काहींनी हे पत्र लिहिले आणि विशेष म्हणजे यांच्या पत्रांवर सह्या आहेत आणि मोबाईल नंबर आहेत त्यांचा नाव मोबाईल नंबर यांचा कुठलाही संबंध नाही कोणीही या मोबाईल नंबर वर संपर्क केला असता ती व्यक्ती नसून दुसरेच कोणीतरी पत्र लिहिले आहे. त्यामुळे हा पूर्ण राजकीय डाव असून त्याकडे विशेष लक्ष देण्यासारखे काही नाही संगमनेरातील मुस्लिम समाजाचा आमदार बाळासाहेब थोरात व काँग्रेस पक्षाने कायम मुस्लिम समाजावर भरभरून प्रेम केले आहे. किंबहुना कधीही समाजात भेदभाव केला नाही. त्यामुळे ते पत्र लिहिणारे भाजपचे हस्तक आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे

No comments:

Post a Comment