नाशिक -दिंडोरी येथे शेतकऱ्यांची आत्महत्या सततची नापिकी, परतीच्या पावसामूळे पिकांचे झालेले नूकसान व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामूळे नैराश्यतून हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 7, 2019

नाशिक -दिंडोरी येथे शेतकऱ्यांची आत्महत्या सततची नापिकी, परतीच्या पावसामूळे पिकांचे झालेले नूकसान व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामूळे नैराश्यतून हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना

नाशिक -दिंडोरी येथे शेतकऱ्यांची आत्महत्या   सततची नापिकी, परतीच्या पावसामूळे पिकांचे झालेले नूकसान व वाढत चाललेला कर्जाचा डोंगर यामूळे नैराश्यतून हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यांने विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. एका आठवड्यात दुसरी शेतकरी आत्महत्येची घटना घडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हस्तेदुमाला (ता. दिंडोरी) येथील विष्णु पांडुरंग राऊत (वय ४१) यांची हस्ते शिवारात ३ एकर शेती आहे. मात्र, परतीच्या पावसामूळे या क्षेत्रातील भात, सोयाबीन, टॉमेटो या पिकाचे झालेले नूकसान तसेच मागील वर्षीही पावसाअभावी पिके करपल्याने हाती काही आले नव्हते.तसेच पत्नी हिराबाई यांच्या नावाने द्राक्षबागेसाठी वर्ष २०१० मध्ये पिंप्री अंचला आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे ४ लाख ३० हजाराचे कर्ज घेतले होते. मात्र द्राक्षबागेतूनही अल्पभाव व अपेक्षीत उत्पन्न न मिळाल्याने घेतलेले कर्ज फेडू शकले नाही. त्यातून कर्जावरील व्याज ७ लाख ३ हजार असे एकूण कर्जाची रक्कम ११ लाख ३३ हजार रुपयाचे कर्ज डोक्यावर झाल्याने तसेच पंधरा दिवसांपूर्वी कर्ज परत फेड न करणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे लिलाव करणार असल्याची माहिती बातमीद्वारे कळाल्याने काही विष्णु राऊत हे मानसिक तणावाखाली होते.

आज सकाळी पत्नी, मुले व आईला शेतात कामासाठी पाठवून मी नंतर येतो असे सांगून विष्णु राऊत हे घरी एकटेच थांबले व सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नैराश्यतून पिकांवर फवारणीचे विषारी औषध सेवन करुन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहीती कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment