आंबेगाव - आंबेगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, November 27, 2019

आंबेगाव - आंबेगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ


चाकण एमआयडीसी मधील नामांकित कंपन्यांमध्ये तंत्र प्रशिक्षण व ट्रेनिंगनंतर नोकरीची सुवर्णसंधी मिळावी यासाठी डायनालॉग इंडिया प्रा.लि. कंपनीचे कार्यकारी संचालक मा.अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ADM Foundation, MITCON व IAIJoinflex Pvt. Ltd यांच्या संयुक्त विद्यमानातून ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांना रोजगार मिळवून देणारे पाहिले दालन यशस्वीपणे खुले करून दिले.

आंबेगाव तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचचा निरोप समारंभ आज बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता डायनालॉग इंडिया प्रा.लि. कंपनीचे कार्यकारी संचालक मा.अक्षय आढळराव पाटील, ADM Foundation व IAIJoinFlex Pvt. Ltd. कंपनीचे कार्यकारी संचालक मा.अमन मेहतानी, संचालक मा.सुरभी मेहतानी, मिटकॉनचे उपाध्यक्ष मा.पराग पवार, युवासेनेचे राज्य विस्तारक मा.सचिन बांगर, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक मा.सागर काजळे व युवासेनेचे तालुका समन्वयक कौस्तुभ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती चाकण औद्योगिक वसाहत येथे उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने कंपनीचे अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पहिल्या बॅचमधील प्रशिक्षणार्थ्यांना दुबई व चाकण येथील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याने समाधानी असल्याचे मा.अक्षय आढळराव पाटील यांनी सांगितले व लवकरच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या बॅचची सुरवात करणार असल्याची माहिती ADM फाउंडेशनच्या संचालक मा.सुरभी मेहतानी यांनी दिली.

No comments:

Post a Comment