राहुरी - राहुरी, नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपूरे मुंबईकडे रवाना. राज्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, November 11, 2019

राहुरी - राहुरी, नगर पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपूरे मुंबईकडे रवाना. राज्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता

राहुरी प्रतिनिधी,
काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान सभा निवडणूकमध्ये राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातून आमदार प्राजक्त तनपूरे यांनी विजय मिळवला. सर्वच स्तरावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या रूपाने राहुरी तालूक्याला प्रथमच राज्यमंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादी काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
        गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपूरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचा पराभव केला. माजी आमदार व खासदार प्रसाद तनपूरे यांच्या नंतर सुमारे सतरा वर्षा नंतर राहुरी शहराला आमदारकीचे पद मिळाले. नव निर्वाचीत आमदार प्राजक्त तनपूरे यांनी शपथ विधीच्या अगोदरच आपल्या कामाला सुरुवात करून जनमाणसात आपला ठसा उमटवीला आहे. प्रसाद तनपूरे यांचा कार्यकाल व आमदार प्राजक्त तनपूरे यांचे घवघवीत यश तसेच राहुरी नगरपरिषदच्या माध्यमातून अवघ्या तीन वर्षात त्यांनी शहरात केलेली विकास कामे लक्षात घेता. सत्ता स्थापने नंतर त्यांना राज्यमंत्री पद मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. आमदार प्राजक्त तनपूरे यांना राज्यमंत्री पद मिळाले तर राहुरी तालूक्याचा इतिहास घडणार असून प्रथमच तालूक्यात लाल दिव्याची गाडी येणार आहे. या राज्यमंत्री पदाच्या चर्चेमुळे राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील प्राजक्त तनपूरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार प्राजक्त तनपूरे यांना मुंबई येथे आमंत्रित केल्या नूसार ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.
        राहुरी तालूक्याला आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या रूपाने राज्यमंत्री पद मिळाले तर राहुरी तालूक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. तसेच तालूक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.


मनोज साळवे सह सतिष फुलसौंदर, राहुरी. 

No comments:

Post a Comment