नाशिक -अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत बेशिस्त वाहनचालकांवर करण्यातील कारवाई - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 7, 2019

नाशिक -अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत बेशिस्त वाहनचालकांवर करण्यातील कारवाई

नाशिक -अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत बेशिस्त वाहनचालकांवर करण्यातील कारवाई.            नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत एक पाऊल पुढे टाकले आहे. पोलिसांच्या वाहन ताफ्यात बुधवारी आधुनिक सोयींनी युक्त अशी वाहन वाहतूक नियमन व्यवस्था आणण्यात आली आहे. या अंतर्गत व्हिडिओ बेस्ड लेजर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम (लेजर स्पीडगन), ब्रेथ अनालायझर आणि टिन्ट मीटर निरीक्षक काम करणार आहे.

या अत्याधुनिक साधनांनी सज्ज अशी दोन वाहने नाशिक पोलीस वाहन ताफ्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-शिंगे यांनी दिली. लेझर स्पीडगनमध्ये मेगा पिक्सल कॅमेरा असून महामार्गासह वर्दळीच्या ठिकाणी ही गन काम करेल. या माध्यमातून वाहनांचा वेग आणि अंतर मोजले जाईल. वाहन आवाजाच्या क्षमतेपेक्षा जोरात भोंगा वाजवतो की काय, याची पाहणी होईल. याचे चित्रीकरण होत असल्याने कायदा मोडला हे सिद्ध करून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करणे सोपे होणार आहे. मद्याचे सेवन करत वाहन चालविणाऱ्यांची तपासणी ब्रेथ अनालायझरने होणार आहे. तसेच, टिन्ट मीटरच्या माध्यमातून वाहनांच्या काचांची दृश्यता तपासली जाणार आहे.

वाहनामध्ये दोन स्वतंत्र पेटय़ा आहेत. एकामध्ये लाइट स्क्रीन आणि दुसरीत सेन्सर आहे. काचेच्या दोन्ही बाजूस या पेटय़ा जोडल्यानंतर त्याच्या पडद्यावर गाडीच्या काचेची दृश्यमानता तपासली जाईल. जेणेकरून वाहनातील गैरप्रकारांना र्निबध घालता येईल. ही वाहने महामार्ग, उड्डाणपुलासह वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालणार आहे.

No comments:

Post a Comment