आंबेगाव - रस्त्यावर सापडलेले दागिने एका व्यक्तीने प्रामाणिकपणे परत करून आदर्श निर्माण केला आहे. विष्णू बांगर याचा सत्कार मंचर पोलिसांनी केला. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, November 10, 2019

आंबेगाव - रस्त्यावर सापडलेले दागिने एका व्यक्तीने प्रामाणिकपणे परत करून आदर्श निर्माण केला आहे. विष्णू बांगर याचा सत्कार मंचर पोलिसांनी केला.

प्रतिनीधी अमोल जाधव

(ता.आंबेगाव ,मंचर )समाजात प्रामाणिकपणा शिल्लक आहे .याचा प्रत्यय मंचर येथे आला आहे .रस्त्यावर सापडलेले दागिने एका व्यक्तीने प्रामाणिकपणे परत करून आदर्श निर्माण केला आहे. विष्णू बांगर याचा सत्कार मंचर पोलिसांनी केला.
सध्याच्या धावपळीच्या युगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असे म्हटले जाते मात्र विष्णू साहेबराव बांगर रा. नाईक निवास नगर रोड बीड यांना  70 हजार रुपयांचे दागिने रस्त्यावर सापडले.हे दागिने त्यांनी मंचर  पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना आणून दिले .पोलिसांनी तात्काळ दागिने मालकाला शोधून त्यांना त्यांचे दागिने परत केले व विष्णू बांगर यांचा मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की विष्णू साहेबराव बांगर हे दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवर मंचर खिंडी जवळुन आळंदीला चालले होते .त्यांना एक नेकलेस व मंगळसूत्र सापडले .त्यांनी ते  पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी ज्यांचे दागिने हरवले आहेत त्याचा शोध घेतला. राहुल काशिनाथ जाधव रा.वारुळवाडी नारायणगाव  यांचेच हे दागिने असल्याची खात्री करून त्यांना दीड तोळ्याचा नेकलेस आणि एक मंगळसूत्र असा 70 हजार रुपयांचा ऐवज पोलीस स्टेशन ने  राहुल जाधव यांच्या ताब्यात दिला.
मंचर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे ,सोमनाथ वाफगावकर ,प्रशांत भुजबळ ,ठाणे अंमलदार जे डावखर यांनी विष्णू बांगर याचा पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार केला आहे.बांगर यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment