दिल्ली - वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, सुप्रीम कोर्टाकडून ऐतिहासिक निर्णय. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, November 8, 2019

दिल्ली - वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, सुप्रीम कोर्टाकडून ऐतिहासिक निर्णय.

दिल्ली - वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, सुप्रीम कोर्टाकडून ऐतिहासिक निर्णय.


 दिल्ली - अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल  सर्वोच्च न्यायालय देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन.
अयोध्येतील मशीद-मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालामुळे सर्व राज्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. पोलिसांचा तसेच सशस्त्र दलांचा कडक बंदोबस्त वाढवला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश एकमेकांना पाठवले जाण्याची शक्यता लक्षात घेऊ न सोशल मीडियावर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
ब्रिटीश येण्यापूर्वी विवादीत जागेच्या बाह्य भागावर हिंदूंचा ताबा होता
ब्रिटिश येण्यापूर्वी राम चबूत्रा, सीता रासोई यांची हिंदूंनी उपासना केली होती असे पुरावे आहेत. रेकॉर्डमधील पुरावा असे दर्शवितो की विवादित जमिनीचा बाह्य भाग हिंदूंच्या ताब्यात होता.
वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देणार
अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, मुस्लिमांना अयोध्येत पर्यायी जागा मिळणार, कोणत्याही धर्माला प्रार्थनेपासून रोखता येत नाही. अलाहाबाद हायकोर्टाने केलेले आस्थेच्या मुद्द्यावर तीन भाग चुकीचे आहेत. वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केला आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा द्यावी - सुप्रीम कोर्ट
सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. ती जबाबदारी केंद्र किंवा राज्य सरकारची आहे. मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन करुन नियम बनवा, केंद्राला आदेश

No comments:

Post a Comment