आंबेगाव - मंचर येथिल वाघवाडी परीसरात पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक एक मेंढी ठार मारली आहे - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, November 12, 2019

आंबेगाव - मंचर येथिल वाघवाडी परीसरात पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक एक मेंढी ठार मारली आहे

प्रतिनिधी अमोल जाधव आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथिल वाघवाडी परीसरात पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक एक मेंढी ठार मारली आहे


मागील वर्षभरापासून आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत आहेत.  आज पहाटे झालेला हल्ला हा मंचर जवळ वाघवाडी  या ठिकाणी पोपट ढाकले यामेंढपाळाच्या मेंढी वर हल्ला झाला असून त्यात एक मेंढी दगावली आहे, वाघ वाडी येथील बडे यांच्या शेतात काल संध्याकाळी मेंढयाचा वाडा बसला असता त्यातील एका मेंढी वर हल्ला करून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मागील चार ते पाच दिवसापासून हा बिबट्या या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच दर्शन देत असून वनखाते मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे असे तेथील स्थानिक शेतकरी सांगतात, आत्तापर्यंत तालुक्यात  बिबट्याने मागील महिन्यात चार ते पाच माणसांवर हल्ले केले आहेत दररोज कुठेतरी जनावरावर हल्ले होत आहेत नागरिक मात्र पिंजरा लावायची मागणी करत आहेत शेतकऱ्यांना या दररोजच्या होणाऱ्या त्रासाकडे तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी दूर्लक्ष करत आहेत, आतापर्यंत झालेल्या अनेक बिबट्यांच्या हल्ल्यानंतर एकाही लोकप्रतिनिधीने त्यासंदर्भात कोणतीच ठोस भूमिका घेतल्याचे एकही उदाहरण दिसत नाही

No comments:

Post a Comment