आंबेगाव - जवळे तस येथे चोरट्यांनी चार बंद घरे फोडली - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, November 7, 2019

आंबेगाव - जवळे तस येथे चोरट्यांनी चार बंद घरे फोडली

जवळे तस ,आंबेगाव येथे चोरट्यांनी चार बंद घरे फोडली

प्रतिनिधी अमोल जाधव

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे शिंदे मळ्यातील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत किरकोळ चोरी केली असल्याचे घटना घडली आहे ही घरे बंद असून घराचे मालक बाहेरगावी राहत असल्याने घरातून नक्की काय चोरीला गेले याबाबत माहिती मिळाली नाही


जवळे तालुका आंबेगाव येथून जवळच असलेल्या शिंदेमळा येथे आज पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान चार ते पाच चोरट्यांनी डॉक्टर प्रकाश रामभाऊ शिंदे, (सध्या राहणार मंचर )राजेश बबन शिंदे (सध्या राहणार मुंबई) मारुती सदू शिंदे (सध्या राहणार अवसरी खुर्द )एकनाथ पिराजी शिंदे (राहणार जवळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे )यांच्या मळ्यातील बंद असलेल्या घरांची कुलपे तोडून आत मध्ये प्रवेश करत घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत किरकोळ चोरी केली आहे या बंद घराचे झालेली चोरी चे मालक बाहेरगावी राहत असल्याने घरातून नक्की कुठला ऐवज चोरी गेला हे कळलेले नाही दरम्यान चोरीची माहिती कळताच मा, पोलीस पाटील उत्तम शिंदे यांनी मंचर पोलिस ठाण्याला कळविले असता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कड,व वाघ साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सकाळी पोलीस अधिकारी नाईकडे ,पोलीस पाटील रवी लोखंडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

चोरट्यांनी चोरी करण्याअगोदर बाजूच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे भुरट्या चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी जवळे येथील ग्रामस्थांनी केले आहे

No comments:

Post a Comment