आंबेगाव - बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांस मंचर पोलिसांनी केली अटक - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, November 9, 2019

आंबेगाव - बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांस मंचर पोलिसांनी केली अटक


बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांस मंचर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी अमोल जाधव

मंचर पोलीस स्टेशनच्या हददीत असलेल्या मौजे लोणी ता आंबेगाव जिल्हा पुणे येथील संतोष दिपचंद शिंगवी हे कामानिमित्त बाहेर गावी गेले असता त्यांच्या घरातून चोरट्यांने ०२/११/२०१९ रोजी दुपारी ०३ . ०० वाजण्याचे सुमारास घराचे कुलुप तोडुन घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण १'६७ ,००० / रूपये किंमतीचा माल चोरी केला होता याबाबत संतोष शिंगवी यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मंचर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता .

सदर गुन्हयाचे तपासामध्ये बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीनुसार मंचर पोलीस लोणी परीसरात पेट्रोलींग करत असताना अमोल किसन रणसिंग (वय २१ वर्षे, रा.लोणी ता . आंबेगांव जि.पुणे )हा युवक संशयास्पद रित्या फिरत असताना मिळुन आला त्याला ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याला अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी गुन्हयात चोरलेल्या मालाची माहीती देत नसल्याने त्याची न्यायालयाकडुन दोन दिवसांची पोलीस कोठडी घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केले मालापैकी २१,६५० / रू रोख रक्कम काढुन दिलेली असुन सदर आरोपी याचेकडे तपास चालु असुन त्याचेकडुन परीसरातील आणखी गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे . तरी सदर गुन्हयाचा तपास मा . पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक  संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील ,पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग गजानन टोम्पे यांचे मागदर्शनाखालील पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे , पो.ना.विलास साबळे ,पो.कॉ . प्रशांत भुजबळ ,पो.कॉ.योगेश रोडे ,पो.हवा.हरीभाऊ नलवडे , पो.कॉ.साळुके यांनी केलेला असुन गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने आणि गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्याचे अनुषंगाने महत्वपुर्ण कामगिरी बजावलेली आहे .

1 comment: