नेवासा - शंकरराव गडाख शिवसेनेत.? ; मिलिंद नार्वेकर आले भेटीला. | C24TAAS |
शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आज सोमवार 28 ऑक्टोंबर रोजी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी सोनई येथील निवासस्थानी दाखल..
नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे अपक्ष उमेदवार शंकराव गडाख हे निवडून आले पण कुठल्या पक्षात जातील या कडे संपूर्ण नेवासा तालुक्यात सह जिल्ह्याचे लक्ष लागले होता मात्र आज सोमवार 28 ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आल्यानंतर कुटुंबीयांसोबत काढलेला फोटो आणि आमदार शंकराव गडाख यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचे काढलेले जुने फोटो व्हायरल केल्याने आणि कार्यकर्त्यांनी फेसबुक व व्हाट्सऍप वर स्टेटसला ठेवल्याने दुपारनंतर नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख हे शिवसेनेत दाखल झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता कुठल्या पक्षात जातील या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.
शंकर नाबदे, नेवासा.मो.9960313029
No comments:
Post a Comment