बारामती -बारामती च्या जोगवडी गावात काल एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 6, 2019

बारामती -बारामती च्या जोगवडी गावात काल एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना


बारामती च्या जोगवडी गावात काल एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना आज उघड झाली आहे.पुणे येथे एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकांनीच हे  कृत्य केल्याच वास्तव आहे. मुळातच विवाहित व अपत्य असलेल्या या शिक्षका विरुद्ध वडगाव -निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
    या घटनेबाबत वडगाव -निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे येथील एका नामांकित शिक्षण संस्थेत कायमस्वरूपी कार्यरत असलेला हा शिक्षक आहे. काल रजा काढून कामावरच हजर नसल्याची पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली. जोगवडी ता. बारामती येथून महाविद्यालयात शाळेसाठी आलेली विद्यार्थिनी घरी परत न आल्यामुळे पालकांनी त्याचा शोध सुरू केला.शालिय अल्पवयीन विद्यार्थिनीस श्री निलेश रामचंद्र कुंभार राहणार लोणी- भापकर याने फूस लावीत पळवुन नेहले.अशी फिर्याद मोरगाव पोलीस मदत केंद्रात पीडित मुलीच्या पालकांनी दिली आहे.
    या घटनेतील विकृत शिक्षकाने पवित्र अशा शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याची कृत्य केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपी सह पीडित अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला. पुणे जिल्ह्यातील अशाच काही घटनेत या शिक्षका विरुद्ध शिक्षण संस्थेने अंतर्गत कारवाई केल्याची माहिती मिळाली.
सी 24 तास साठी प्रतिनिधी- मनोहर तावरे बारामती

No comments:

Post a Comment