वडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, October 17, 2019

वडगावशेरी मधील जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारेवडगावशेरी मधील   जनतेच्या मनातील आमदार जगदिश मुळीकच : माजी आमदार बापुसाहेब पठारे

वडगावशेरी मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार जगदिश मुळीक यांना  नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार मुळीक यांच्या विकास कामांमुळे ते तळागळातील नागरीका पर्यंत पोहचले आहेत. वडगाव शेरी मतदार संघातील जनतेच्या मनातील आमदार हे जगदिश मुळीकच आहे. पुन्हा  मुळीकच निवडूण येणार असल्याचे मत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय,रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांच्या प्रचारार्थ फुलेनगर,शांतीनगर,प्रतीक नगर,जाधव नगर,इंदिरा नगर,भागात पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी पठारे बोलत होते. यावेळी  ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,शीतल सावंत, अजय सावंत,महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पठारे म्हणाले की, वडगाव शेरीच्या विकासाला आमदार जगदिश मुळीक यांन गती दिली. वेगवेगळे प्रकल्प वडगाव शेरी मध्ये राबविले आहेत. यामुळे त्यांना वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक प्रभागातून नागरीकांचा उत्स्फुत प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून आमदार जगदिश मुळीक यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी आमदार जगदिश मुळीक म्हणाले की, जे एका पक्षाचे झाले नाही. ते जनतेचे काय होणार आहे. निवडणूका आल्यानंतर स्वार्थासाठी पक्ष बदतात. नागरीकांच्या विकासापेक्षा स्वतःचा विकासाची काळजी असणा-याना  जनता घरी बसवेल

No comments:

Post a Comment