पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात रमेश बागवे यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद - सकारात्मक प्रचारावर भर देणार : रमेश बागवे - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 6, 2019

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात रमेश बागवे यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद - सकारात्मक प्रचारावर भर देणार : रमेश बागवे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात रमेश बागवे यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद

सकारात्मक प्रचारावर भर देणार : रमेश बागवे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचाराचा नारळ आज ग्रामदैवत भवानी माता मंदिर येथे फोडण्यात आला.

याप्रसंगी प्रसंगी खासदार वंदनाताई चव्हाण, काँग्रेस पक्षाचे मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, कमलताई ढोले पाटील, पी. ए. ईनामदार, अंकुश काकडे, रिपब्लिकनचे राहुल डंबाळे, नगरसेवक प्रशांत जगताप, अभय छाजेड, शिवाजी केदारी, प्रदिप जगताप, लताताई राजगुरु, सुजाता शेट्टी, अविनाश बागवे, अजित दरेकर,रवींद्र धंगेकर, रफिक शेख, चाँदबी नदाफ, विनोद मथुरावाला, करण मकवाना, मंजूर शेख, रजनीताई त्रिभुवन, संगीता तिवारी, संगीता पवार, भोलासिंग अरोरा, विठ्ठल गायकवाड, गौतम महाजन सोनाली मारणे, शर्वरी गोतरणे, शिलार रतनगिरी, दीपक रामनानी, विशाल मलके, साहिल केदारी सह मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना रमेश बागवे यांनी सांगितले की भाजप-शिवसेना यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्णता नकारात्मक स्वरूपाचाच आहे. सत्ता कालावधीमध्ये त्यांना शिक्षण-आरोग्य-रोजगार- सामाजिक सुरक्षा- झोपडपट्टी धारकांचे प्रश्न, कॅंटोन्मेंट भागातील नागरिकांचे प्रश्न याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेता आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने लोकहिताच्या राबविलेल्या योजना बंद करण्याचे निदाव्या जनक काम झाले असल्याने जनतेमध्ये सत्ताधार्यां बद्दल असलेल्या रोषाचा फायदा मिळणार आहे.

मागील पाच वर्षांपासून मतदारसंघांमध्ये ठेवलेला सततचा संपर्क, सरकारविरोधी केलेली आंदोलने ,मित्रपक्ष व सहानुभूतीदार यांची बांधलेली पक्की मोट या मला विजयापर्यंत घेऊन जाण्यास सक्षम असल्याने संपूर्ण प्रचार कालावधीत आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देणार आहोत.

भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरिकां कडून तुफान प्रतिसाद मिळाला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment