पुणे - वडगावशेरी मतदार संघात भाजपचा शत प्रतिशत विजय ः आमदार जगदिश मुळीक - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, October 19, 2019

पुणे - वडगावशेरी मतदार संघात भाजपचा शत प्रतिशत विजय ः आमदार जगदिश मुळीक

वडगावशेरी  मतदार संघात भाजपचा शत प्रतिशत विजय ः आमदार जगदिश मुळीक 
वडगाव शेरी ः  गेल्या पाच वर्षामध्ये मोठया प्रमाणात विकास कामे केली  आहेत.  वडगाव शेरी मतदार संघामध्ये  भाजपची ताकद वाढली आहे. विकास कामांमुळे नागरीकांचा भाजपला प्रतिसाद मिळत आहे. पराभव समोर दिसत असल्यानेच विरोधकांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतोत. विरोधक खोटया अफवा पसरवून विजयी मिळण्याची भाषा करत आहे. या अफवांना मतदार थारा देणार नाही.   वडगावशेरी मतदार संघामध्ये शत प्रतिशत भाजपचा विजय होणार असल्याचे मत भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप या महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी आज गिताई लॉन्स धानोरी रोड, विश्रांतवाडी चौक, मेंटर कॉर्नर, फुलेनगर आरटीओ, हरिगंगा सोसायटी, आंबेडकर सोसायटी, गोल्फ क्लब चौक, शास्त्रीनगर चौक,विमाननगर , टाटा गार्डरूम,चंदनगर  या भागातून प्रचारा रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप चंदननगर शिवाजी महाराजांच्या पुतळया जवळ  केला. यावेळी  मुळीक बोलत होते.  यावेळी  यावेळी  माजी आमदार बापुसाहेब पठारेउपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे, नगरसेवक संजय भोसले, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, बापुसाहेब कर्ण गुरुजी, अॅड अविनाश साळवे, संदिप ज-हाड, राहुल भंडारे, मारुती सांगडे, नगरसेविका शितल सावंत, सनिता गलांडे, शितल शिंदेफरजाना शेख, श्वेता चव्हाण, ऐश्वर्या जाधव, मुक्ता जगताप, श्वेता गलांडे, रमेश आढाव, चंद्रकांत टिंगरे यांच्या सह  महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.  महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी मुळीक म्हणाले की, वडगाव शेरी मतदार संघातील प्रत्येक भागातून भाजपला उत्स्फुत स्वागत करत आहे.  गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची पावती नागरीक मला देतील.  वडगाव शेरी मध्ये भाजप मोठया मताधिक्क्याने निवडूण येणार आहे.  मी केलेली काम विरोधक पुढील पाच वर्ष करणार असल्याचे सांगत आहे. ज्यांच्या कडे  विकासाची दुष्टी नाही. ते खोटया अफवाचा आधार घेतात.  वडगाव शेरीचा विकास हेच ध्येय आहे. 
आमदार जगदिश मुळीक यांनी वडगाव शेरी मतदार संघातील विकास कामांना गती दिली आहे. वडगाव शेरीचा विकास होतोय. मात्र, हा विकास विरोधकांच्या डोळयात खुपत आहे. यामुळे विरोधक विकास कामाच्या ऐवजी खोटा प्रचारावर भर देत आहे. माझा भाजप प्रवेश हा कोणत्याही दबावाखाली झाला नाही.  माझ्या प्रवेशाबाबत खोटा प्रचार करून  न मिळणारी सहानभूती  घेण्याचा प्रकार विरोधक करत आहे. मात्र, मतदार या भुल थापांना भुलणार नाही. आमदार जगदिश मुळीक पुन्हा दुस-यांदा निवडूण येतील असे मत माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment