पुणे, दि. ४ ऑक्टोबर, २०१९ : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (A), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करीत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिरोळे यांनी आपला मतदारसंघातील प्रचार आज सुरु केला.
आज त्यांनी खंडोजी बाबा मंदिरातील समाधीचे दर्शन घेतले याबरोबरच तुकाराम पादुका चौकातील तुकाराम महाराज मंदिरातील पादुकांचेही दर्शन घेतले या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे, राजश्री काळे, प्रतुल जगदाळे, गणेश बागडे, अशोक लोखंडे, राम म्हेत्रे, ओंकार केदारी, नितीन कुंवर, योगेश बाचल आदी अपस्थित होते.
या आधी सकाळी फर्गसन रस्त्यावरील रुपाली हॉटेल येथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या अपेक्षा जाणून घेत त्यावर चर्चा केली. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणा-या सिद्धार्थ शिरोळे यांचा उत्साह पाहून उपस्थित नागरिकांनीही त्यांचे कौतुक करीत त्यांची पाठ थोपटली.
या नंतर खडकी येथील अजमेर शरीफ ख्वाजा गरीब नवाज दर्गा आणि गांधी चौक, खडकी येथील गणेश मंदिरात आरती करीत सिद्धार्थ शिरोळे यांनी तेथील पदाधिकारी व नागरिक यांची भेट घेतली. या भागातील नागरिकांच्या अपेक्षा देखील त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी खडकीचे नगरसेवक विजय शेवाळे, उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील एस. के. जैन, माजी नगरसेवक मुकेश गवळी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment