काँग्रेसचे सदानंद शेट्टी यांनी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज घेतला मागे ! याप्रसंगी कार्यकर्ते झाले भावूक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सदानंद शेट्टी यांचा अपक्ष दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला असून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची फौज त्यांच्यासोबत अर्ज माघारी वेळी उपस्थित होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रसंगी सदानंद शेट्टी यांच्या कार्यकर्ते कॅन्टोन्मेंट येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाबाहेर भावनिक झाले असून त्यांना आपले अश्रू थांबवता आले नसून सदानंद शेट्टी यांना त्यांनी गेटवरच मध्ये जाण्यापासून रोखले असून आपला संतापही काँग्रेसच्या नेत्यांकडे व्यक्त केला आहे. दरवेळेस आम्हीच माघार का घ्यायची असा जाब त्यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला आहे . दरम्यान याप्रसंगी स्वतः सदानंद शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला
No comments:
Post a Comment