पुणे - जिजाऊ फाऊंडेशन कडून सामाजिक बांधिलकी जपत केली दिवाळी साजरी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, October 26, 2019

पुणे - जिजाऊ फाऊंडेशन कडून सामाजिक बांधिलकी जपत केली दिवाळी साजरी

जिजाऊ फाऊंडेशन कडून सामाजिक बांधिलकी जपत केली दिवाळी साजरी

पुणे प्रतिनिधी: पुण्यातील नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे जिजाऊ फाऊंडेशन यांनी या वर्षी ही पर्वती जनता वसाहत मधील पालकतत्व घेतललेल्या २० मुलींसाठी दिवाळी साजरी करण्यात आली .त्यांना नवीन कपडे व दिवाळी फराळ , नित्योपयोगी वस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रतिभाताई हरिभक्त( विभागीय समादेशन R.S.P. & C.D. पुणे विभाग ,श्री.अनिल गुंजाळ सर ( शिक्षण विभाग साहय्यक आयुक्त ) ,सौ.अर्चीता मडके मँडम ( शिक्षणतज्ञ), श्री.शिरीषजी मोहिते ( श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ मंदिर ट्रस्ट ऊत्सव प्रमुख ) ,श्री.संजयजी भैलुमे सर ( मुख्याध्यापक हिरे हायस्कूल) सौ.अलकाताई जाधव ,हे होते.सर्वानी मुंलाना छान मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना फाऊंडेशन अध्यक्षा सौ.ज्योती जिंतेद्र ढमाळ यांनी केले तर ज्ञानाची वारी वंचिताच्या दारी या प्रकल्पात मध्ये आपली मोफत सेवा देणारे सर्व शिक्षक होते, व काही मुंलीच्या पालकानी सुध्दा मनोगत मांडले. तसेच फाऊंडेशन ने  शैक्षणिक दत्तक घेतलेल्या मुंलीनी सुध्दा कोणी पोलीस आधीकारी होण्याचे बोलून दाखवले. तर एका मुंलीने आयपीएस ऑफिसर होणार असे मी फाऊंडेशन मध्ये आल्यामुळे होणार असे वाटू  लागले अस सांगितले ,तसेच कार्यक्रमाचे निवेदन फाऊंडेशन च्या एका मुंलीनेच गायत्री शेंडकर हीने केले, तसेच फाऊंडेशन ला मदत केलेल्या सर्वाचे आभार  सौ.श्र्वेता किशोर ढमाळ यांनी मांडले

No comments:

Post a Comment