माकणी शिवारात दहा फुट लांबीची मगर सापडल्याने एकच खळबळ.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील शिवारात मगर जातीचा प्राणी सापडल्याने शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन असाच प्रकार लोहारा खु गावाजवळ पाच दिवसापुर्वी मगर आढळली होती त्यामुळे शेतकरी शेताकडे जाण्यास धजत नाहीत. तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्प धरण मोठे असुन या धरणाच्या थोड्या अंतरावर दादासाहेब मुळे उपसरपंच यांची जमीन आहे. त्या जमिनीवर नदीच्या बाजूला संबंधित शेतकऱ्यांना 10 फुट लाबीची मगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत येथील नागरिकांनी वनखात्याचे लोहारा नुतन वनपरिमंडळ अधिकारी एस डी माळी यांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पद्धतशीरपणे सापळा रचून जेसीबी च्या साहाय्याने ती मगर पकडुन पुणे येथील वरिष्ठ वनकार्यालयाकडे पाठवीण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. या वेळी उमरगा वनपरिमंडळ अधिकारी डि एम काबळे ,ए जी चौगुले वनरक्षक, विठ्ठल जाधव, तीन वाचमेनासह माकणी ग्रामस्थानच्या मदतीने मगरीलापकडण्यात वनविभागाला येश आले या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी
यशवंत भुसारे
लोहारा उस्मानाबाद
No comments:
Post a Comment