शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरात
संगमनेर : शाविद शेख
संगमनेर विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना- भाजप आणि मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार नवले साहेबराव रामचंद्र यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे बुधवार दि. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जाणता राजा मैदान याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, नगर दक्षिण लोकसभा खासदार सुजय विखे, शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेनचेतालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, रासपचे शहराध्यक्ष कैलास कासार, आप्पा केसेकर, शौकत जहागिरदार, जावेद जहागिरदार, राजेश चौधरी, शरदनाना थोरात, अशोक सातपुते, राधावल्लभ कासट, कैलास वाकचौरे, डॉ. भानुदास डेरे, अॅड. श्रीराज डेरेयासह महायुतीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान संगमनेर विधानसभेसाठी साहेबराव नवले यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. साहेबराव नवले यांच्या रूपाने संगमनेर ला नवीन आणि अभ्यासु नेतृत्व लाभेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. परिवर्तनाच्या या लढयात सर्वांनी आपले योगदान देण्याचे आवाहन यावेळी उमेदवार नवले साहेबराव रामचंद्र यांनी केले आहे
No comments:
Post a Comment