नांदेड - जी प उपाध्यक्षां च्या भेटीत दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, October 30, 2019

नांदेड - जी प उपाध्यक्षां च्या भेटीत दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे!

नांदेड - जी प उपाध्यक्षां च्या भेटीत दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे!

कामावर कमी, गैरहजर कर्मचारीच अधिक

Ao/माहूर तालुका पंचायत समितीच्या कार्यालयातील अनेक विभागातील कर्मचारी गैरहजर असल्याचे पाहून जीप उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी झाडाझडती घेत अनुपस्थित कर्मचा-यांची संख्या पाहून गट विकास अधिकारी यांच्या दालनात उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.पंचायत समिती मधील सर्व विभागाची परिस्थिती सारखीच असल्याने व निम्मे कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांनी जिप नांदेड मधील त्या त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गंभीर प्रकरणी दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यां वर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.या वेळी जीप उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या सोबत सभापती दत्तराव मोहिते,राजकुमार भोपी, उकंडराव जाधव, लक्ष्मण बेहरे, सुजित बेहरे,अविनाश टनमणे,दत्तात्रय शेरेकर, त्यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.


Vo/नांदेड जि.प.चे उपाध्यक्ष व माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी यांनी पत्रकारांच्या ताफ्यासह तालुक्यातील विविध कार्यालयांना अचानक भेटी देवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.माहूर पंचायत समितीला एकूण ४१ कर्मचाऱ्यांची नेमणूक असून त्यातील ५ पदे रिक्त आहेत,तर ४ कर्मचारी सुट्टीवर,२ इलेक्शन ड्युटी,२ विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने तर २ तर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या तोंडी आदेशाने २ असे ४ प्रतिनियुक्तीवर,  ५ विना रजा गैरहजर, तर १२ पैकी १० कंत्राटी कर्मचारी गैरहजर अशी परिस्थिती आज पस ला भेट दिल्यावर आढळून आली.त्या नंतर तालुका आरोग्य विभागाची झाडाझडती घेण्यात आली.तेथेही ८ पैकी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी.भिसे यांच्या सह ४ कर्मचारी गैर हजर होते. यावेळी अनेक कर्मचारी कोणत्याही प्रकारची रजा नोंद न करता अनुपस्थित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. कारणाशिवाय गैरहजर असलेल्या कर्मचा-यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जि.प.उपाध्यक्षांनी माहूरच्या गटविकास अधिका-यांना दिले आहेत.

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

No comments:

Post a Comment