पुणे : कॅन्टोन्मेंट जनादेश भाजप विरोधी : कमल ढोलेपाटील - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 6, 2019

पुणे : कॅन्टोन्मेंट जनादेश भाजप विरोधी : कमल ढोलेपाटीलकॅन्टोन्मेंट जनादेश भाजप विरोधी : कमल ढोलेपाटील

पुणे : मुख्यमंत्री भाजप साठी जनादेश मागत फिरत असले तरी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील जनादेश हा पूर्णता भाजप विरोधी असून भाजप सरकार पराभूत करण्यासाठी रमेश बागवे यांचा प्रचंड बहुमताने निवडून देण्याच्या मित्र पक्षांसह प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व माजी आमदार कमलताई ढोले-पाटील यांनी व्यक्त केले

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन मित्र पक्षाचे उमेदवार रमेश बागवे यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वाजता एमजी रोड येथे माजी आमदार कमल ढोलेपाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर प्रसंगी काँग्रेस नेते मोहन जोशी, उल्हास ढोलेपाटील, विनोद मथुरावाला, मोहनसिंग राजपाल, रजनी त्रिभुवन, लताताई राजगुरू, मौलाना काझमी, अजित दरेकर,चाँदबी नदाफ, वीरेंद्र किराड, रफिक शेख, रिपब्लिकन चे राहुल डंबाळे, हाजी नदाफ, विठ्ठल गायकवाड, गौतम महाजन, करण मकवाना, अविनाश बागवे, भोलासिंह अरोरा, मुंजुर शेख, साहिल केदारी, रशीद खिजर, जोशिवा रत्नम, शिलार रतनगिरी, सुजित यादव, विठ्ठल थोरात, इस्माईल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment