कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेशदादा बागवे यांनाच निवडून देण्याचं निर्धार - नगरसेविका सुजाता शेट्टी
पुणे -महाआघाडीचे उमेदवार मा.गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे यांच्या विजयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकवटले असून त्याचा प्रत्यय मंगळवार पेठे झालेल्या सभेत आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मंगळवार पेठ येथील श्रमिकनगर येथे झालेल्या सभेत बोलताना नुकत्याच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सदानंद शेट्टी यांच्या पत्नी ,काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी म्हणाल्या "आम्ही रमेश दादा बागवे यांनाच बहुमताने निवडून आणणार”. रमेशदादा बागवे यांचा दांडगा जनसंपर्क, मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणून केलेली प्रचंड विकास कामे यांच्या जोरावर मंगळवार पेठेतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेश दादा बागवे यांनाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेतील प्रमुख नेते आमदार श्री विश्वजित कदम यांनी भारतीय जनता पार्टीवर हल्ला चडवताना मागील पाच वर्षात हा मतदार संघ भाजपच्या निष्क्रिय आमदाराने 25 वर्षे मागे नेऊन ठेवला. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे सर्वसामान्यांची दैना उडाली, 25 नागरिक मरण पावले त्यावेळी भाजप नेते जल्लोष यात्रा काढण्यात मग्न होते. आपले पालकमंत्री पूर ओसरल्यावर पाहणी करायला आले. अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका. सर्वसामान्यांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या रमेशदादा बागवेना यावेळी विजयी करून कॅन्टोन्मेंटचे भविष्य उज्वल करा, असे आवाहन करतानाच " सुजाताताई तुम्ही रमेश दादांना निवडून द्या, आघाडी सरकार आल्यावर रमेशदादा बागवे याना आम्ही मंत्रिपद निश्चितच देऊ" असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भीम आर्मी चे नेते श्री दत्ता पोळं यांनीही रमेशदादा बागवे यांना पाठिंबा देऊन भाषण केले.
याप्रसंगी नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, विजय चंडालिया, भगवान धुमाळ, सौ. निलीमा लालबिगे, रशीद खिजर, आमिर शेख , विजय खळदकर , विशाल मलके, सौं . वैशाली रेड्डी, अड नितीन परतानी, रवी आरडे, साहिल केदारी , राजेश शिंदे, जगताप वाल्मिकी जगताप, कल्पना भोसले व सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment