संगमनेर : संगमनेरात गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचे उद्घाटन संपन्न संगमनेर येथे प्रथमच शुगर फ्री मिठाई उपलब्ध - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 6, 2019

संगमनेर : संगमनेरात गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचे उद्घाटन संपन्न संगमनेर येथे प्रथमच शुगर फ्री मिठाई उपलब्ध


संगमनेरात गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचे उद्घाटन संपन्न
संगमनेर येथे प्रथमच शुगर फ्री मिठाई उपलब्ध

संगमनेर : शाविद शेख

संगमनेर शहरातील प्रसिद्ध उद्योजक व संगमनेर मर्चंटस् बँकेचे माजी व्हा.चेअरमन श्री.गुरुनाथ भिकनशेठ बाप्ते यांचे गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचे उद्घाटन रविवार दि. ६ आॅक्टोबर रोजी संपन्न झाले. गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीट होममध्ये संगमनेरात प्रथमच शुगर फ्री मिठाई उपलब्ध होणार असल्याची माहिती श्री.गुरुनाथ बाप्ते यांनी सी चोवीस तासशी बोलतांना दिली.
 
गेल्या पाच वर्षांपासून नविन नगर रोड याठिकाणी गुरुनाथ बाप्ते यांची गुडमॉर्निंग बेकरी अल्पावधीतच नावारुपाला आली. ही बेकरी ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने सर्वांनीच बेकरीला भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे आता श्री.बाप्ते यांनी संगमनेर मध्ये प्रथमच शुगर फ्री मिठाई नागरिकांना मिळावी. यासाठी गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचे दालन सुरु केले आहे. या दालनात गावराण तुपातील केशर जिलेबी, सर्व मिठाई शंभर टक्के शुद्ध खव्यापासूनच बनते, कुठल्याही प्रकारचे प्रिजरवेटीव्हज् वापरत नाही, सर्व मिठाई उच्च प्रतीच्या ड्रायफुटस् पासूनच बनते, केशर कतली, केशर पेढा, जिलेबी यामध्ये काश्मिरी केशरचा वापर असणार आहे. या उद्घाटन प्रसंगी अरविंद गाडेकर, सचिन पलोड, भिकनशेठ बाप्ते, परदेशी सर, दिपक टाक, सोनू राजपाल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी गुडमॉर्निंग बेकरी अ‍ॅण्ड स्वीटचेमालक गुरुनाथ बाप्ते यांनी माहिती दिली.
श्री.अरविंद गाडेकर यांनीही गुडमॉर्निंग अ‍ॅण्ड स्वीटला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment