संगमनेर - प्रदेशाध्यक्ष आ.थोरातांच्या उपस्थितीत मंगळवारी ( 8 ऑक्टो ) निझर्णेश्‍वर येथे प्रचाराचा शुभारंभ - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, October 6, 2019

संगमनेर - प्रदेशाध्यक्ष आ.थोरातांच्या उपस्थितीत मंगळवारी ( 8 ऑक्टो ) निझर्णेश्‍वर येथे प्रचाराचा शुभारंभ


प्रदेशाध्यक्ष आ.थोरातांच्या उपस्थितीत मंगळवारी ( 8 ऑक्टो ) निझर्णेश्‍वर येथे प्रचाराचा शुभारंभ
संगमनेर,राहाता व श्रीरामपुर विधानसभेसाठी काँग्रेसचा प्रचार प्रारंभ मोठ्या संख्येने उपस्थित रहा

काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे आवाहन


संगमनेर : शाविद शेख

संगमनेर, राहाता व श्रीरामपुर मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दि.8 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10. वा श्री.क्षेत्र निझर्णेश्‍वर मंदिर (कोकणगांव ) येथे होणार असून या प्रचार शुभारंभ प्रसंगी युवकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस चे युवक प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सी चोवीस तासाशी बोलताना केले आहे.

सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, कवाडेगट, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व पुरोगामी , मित्रपक्षांच्या आघाडीच्या वतीने संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे उमेदवार आहेत. तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीच्या वतीने सुरेश जगन्नाथ थोरात हे तर श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातून लहू नाथा कानडे हे उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दि.8 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10. वा निझर्णेश्‍वर कोकणगांव येथे होणार आहे. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा.खेमनर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात,कपील पवार, दिलीपराव शिंदे, डॉ.एकनाथ गोंदकर, सुधाकरराव रोहम, श्रीरामपुर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, राहाता राष्ट्रवादीचे सुधीर म्हस्के आदिंसह विविध पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी संगमनेर,शिर्डी व श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातील नागरिक, महिला व युवक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, राहाता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे,श्रीरामपुरचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक,विश्‍वासराव मुर्तडक, निखील पापडेजा, सौ.अर्चनाताई बालोडे, आनंद वर्पे, सोमेश्‍वर दिवटे, अनिस शेख, वसीम शेख, सुरेश झावरे, व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी व मित्रपक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment