नेवासा | 2 लाख रुपयांची रोकडा पकडली. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 7, 2019

नेवासा | 2 लाख रुपयांची रोकडा पकडली. | C24Taas |

नेवासा - अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा तालुक्यातील खडका फाटा टोलनाक्यावर आचारसंहिता कक्षाच्या नाका पथकाने एका कारमध्ये दोन लाख रुपयांची रोकड पकडली आहे.
औरंगाबादकडून मुंबईकडे जाणारी एम.एच.-२०, ई.वाय.-९३९९ ब्रिझा कारमधून सदर रक्कम जप्त करण्यात आली. या कारला नाकाबंदी पथकाचे ई.डी. पाखरे यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश कानडे, संभाजी गर्जे, नितीन भताने यांनी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान गाडीत एका पांढºया पिशवीत पाचशे रुपयांच्या नोटा असलेले चार बंडल अशी दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली. घटनेनंतर पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख, शेखर शेलार यांना बोलवले. त्यांनी टोलनाका येथे या रकमेचा पंचनामा करून सदरची कार नेवासा तहसील कार्यालयात जमा केली आहे. सदर रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात येईल. शहानिशा केल्यानंतरच पुढील कार्यवाही होणार

No comments:

Post a Comment