नेवासा | 17 उमेदवार रिंगणात ; प्रत्येक केंद्रावर दोन EVM मशीन असणार , कोण आहे उमेदवार पहा. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, October 7, 2019

नेवासा | 17 उमेदवार रिंगणात ; प्रत्येक केंद्रावर दोन EVM मशीन असणार , कोण आहे उमेदवार पहा. | C24TAAS |

नेवासा - अखेरच्या दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज मागे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता 17 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
चिन्ह वाटपामध्ये प्रतिष्ठेचे झालेले बॅट  हे चिन्ह ईश्वर चिठ्ठीद्वारे माजी आमदार गडाख यांना मिळाले. चिन्ह मिळाल्यावर गडाख गटाकडून शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
      नेवासा विधानसभेसाठी 17 उमेदवार असले तरी राष्ट्रवादीचे उमेदवार नसल्याने आता आजी-माजी आमदारांमध्ये सरळ लढत होत आहे.आज 20 उमेदवारांपैकी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी  व माजी सभापती  सुनिताताई गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पार्टीच्या वतीने भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर अपक्ष उमेदवार अशोक कोळेकर,अजय कोळेकर यांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले.
     तसेच अपक्षांमध्ये 4 उमेदवारांनी कपबशी हे चिन्ह मागितले होते. लक्ष्मीबाई तुकाराम गडाख,विशाल वसंत गडाख,रामदास गोल्हार,रामदास नजन या चार ही उमेदवारांच्या चिठ्ठी टाकून रामदास नजन यांना कपबशी हे चिन्ह मिळाले.       
        17 उमेदवारांमध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह केवळ 3 जण राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत.

निवडणूक रिंगणातील उमेदवार पुढीलप्रमाणे :-
आमदार बाळासाहेब मुरकुटे (भाजप),विश्वास वैरागर (बसपा ),सचिन गव्हाणे (मनसे),कारभारी उदागे(आंबेडकर राईट पक्ष ),कारभारी धागडे(संत संदेश पार्टी), शशिकांत मतकर(वंचित बहुजन आघाडी) शंकरराव गडाख(क्रांतिकारी शेतकरी),रामदास गोल्हार(अपक्ष),विठ्ठल देशमुख (अपक्ष),भाऊसाहेब जगदाळे( अपक्ष ),मच्छिंद्र मुंगसे(अपक्ष ),राजुबाई भोसले (अपक्ष),राजेंद्र निंबाळकर (अपक्ष), रामदास नजन(अपक्ष),लक्ष्मीबाई तुकाराम गडाख(अपक्ष),विलास गडाख(अपक्ष), ज्ञानदेव पाडळे(अपक्ष )

शंकर नाबदे - C तास नेवासा,मो.9960313029

No comments:

Post a Comment